ग्रामस्तरीय मृद तपासणी प्रयोगशाळांसाठी २९ जुलै पर्यंत अर्ज मागविले

0
37

 

धाराशिव :-  राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कॅफेटेरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणार आहे.या अंतर्गत ग्रामस्तरीय मृद चाचणी तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यानुसार २ लक्ष २२ हजार मृद नमुन्यांची तपासणी ग्रामस्तरीय प्रयोगशाळांमार्फत करण्यात येणार आहे.यासाठी राज्यात एकूण ४४४ नवीन प्रयोगशाळांना मान्यता मिळालेली असून,त्यापैकी धाराशिव जिल्ह्यासाठी १५ प्रयोगशाळांची मंजुरी प्राप्त झाली आहे.कृषि संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण),कृषि आयुक्तालय,पुणे यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार सदर प्रयोगशाळा उभारणीसाठी शेतकरी उत्पादक संस्था (FPOs),प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS),कृषि चिकित्सालये,कृषि व्यवसाय केंद्रे (AC/ABC), माजी सैनिक,महिला बचत गट (SHG),शेतकरी सहकारी संस्था,कृषी निविष्ठांचे किरकोळ विक्रेते तसेच शाळा/महाविद्यालयातील युवक-युवती पात्र आहेत.या योजनेत प्रत्येक प्रयोगशाळेसाठी १ लक्ष ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी २९ जुलै २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here