शिवाई शैक्षणिक संकुल परीसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर 

0
107

उमरगा :– कोरेगांववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे  दि. 23  रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीआरपीएफ सब इन्स्पेक्टर युवराज बनजगोले यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.  सब इन्स्पेक्टर युवराज बनजगोले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी विषयी मार्गदर्शन केले.खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी नोकरीमध्ये संधी आहेत. फार्मसी पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यापासून प्रथम वर्षांपासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. राज्य व केंद्रीय स्तरावर आरोग्य, सीआरपीएफ, संरक्षण दलात औषधनिर्माण अधिकारी म्हणून नोकरी आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा. योग्य पुस्तके निवडावीत. रोजचे वेळापत्रक ठरवावे. जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे यावेळी ते म्हणाले. प्रा.अजय बेडदुर्गे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी अधिक मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, प्रा.अशोक गायकवाड डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.चनबस शेटगार, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here