उमरगा : शहरातील मुगळे हॉस्पीटल च्या कंपाऊंड वाल च्या जवळ अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचा बनाव करुन एका महिले जवळ असलेले 143000 हजार रुपयांचे सोने लुटुन फरार झाले असल्याची घटना दि.25 रोजी दिवसाढवळ्या घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
सविस्तर वृत्त , शहरातील क्रांती भगवान कांबळे, वय 56 वर्षे, रा. मुकबधरीर शाळे शेजारी माने नगर ,उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांना दि.25.07.2025 रोजी 04.50 वा. सु.मुगळे हॉस्पीटलचे कंपाउंड वाल जवळ फिर्यादीस अज्ञात इसमानी “हम पोलीस वाले है यहा पे एक औरत का खुन हुवा है तुम इतना सोना नही पहेन सकते आपके सुरक्षा के लीये हमे यहा ड्युटी दि गई है” असे म्हणून पोलीस नावाचे आयकार्ड दाखवून फिर्यादीचे गळ्यातील व हातातील 8.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने गंठण व पाटल्या एकुण 1,43,000₹ पर्समध्ये ठेवायाला सांगुन फिर्यादीचे नकळत पर्समधील दागिने काढून घेवून फसवणुक केली आहे. अशा मजकुराची फिर्याद-क्रांती कांबळे यांनी दि.26.07.2025 रोजी दिली या आधारे अज्ञात इसमा विरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 318(4), 3(5)अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.


