एस टी महामंडळाच्या धाराशिव विभागात शिकाऊ उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

0
1115

धाराशिव :–  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) धाराशिव विभागात २०२५-२६ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.इच्छुक आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर २८ जुलै ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाईन नोंदणी करून Establishment Code – E03172700669 या आस्थापनेकरिता अर्ज करणे आवश्यक आहे.अभियांत्रिकी पदवीधर व पदवीकाधारक उमेदवारांनी www.nats.education.in या पोर्टलवरून MSRTC Osmanabad Division या आस्थापनेकरिता Establishment Code – WMHOSC000001 वापरून अर्ज सादर करावा.अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट प्रत,शैक्षणिक कागदपत्रांसह,२९ जुलै ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय, धाराशिव (डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ) येथे जमा करणे बंधनकारक आहे.भरती प्रक्रिया शुल्क खुले प्रवर्गासाठी ₹५९० (₹५०० + १८% जीएसटी) तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹२९५ (₹२५० + १८% जीएसटी) इतके निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क MSRTC FUND ACCOUNT PAYABLE AT OSMANABAD या नावाने राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरच्या स्वरूपात सादर करावे लागेल.मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याचा जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.एकूण १४० जागांपैकी प्रमुख जागा अशा आहेत.मोटार मेकॅनिक व्हेईकल – ६५,अॅटोइलेक्ट्रीकल/इलेक्ट्रेशियन – १६,मेकॅनिक ऑटोइलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स – २०,शीट मेटल – २२,वेल्डर – १०,डिझेल मेकॅनिक – ४, एसी/रेफ्रिजरेशन मेकॅनिक – १ तसेच अभियांत्रिकी पदवीधर – १ आणि पदवीकाधारक – १.या प्रक्रियेनंतर कागदपत्र तपासणी २५ ऑगस्ट २०२५ रोजी केली जाणार आहे. अपूर्ण प्रोफाइल,चुकीचा ट्रेड किंवा आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्यास अर्ज अमान्य ठरेल,असे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here