साऊ ए.म.पु. समितीचा स्तुत्य उपक्रम ; शासकीय योजनेची माहिती देण्यासाठी मेळावा

0
163

उमरगा:- साऊ ए.म. पु. समितीमार्फत बाल संगोपन, संजय गांधी निराधार,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ , श्रावणबाळ योजना व दिव्यांग इत्यादी शासकीय योजनेची माहिती देण्यासाठी दि.27 रोजी भुसणी येथे शासकीय योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहूराज वह्नाजे , माजी उपसरपंच राजेंद्र वह्नाजे व ग्रामपंचायत सदस्य बलभीम वह्नाजे या सर्वांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, यांच्या प्रतिमेचे पूजन करून , कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी बाल संगोपन या योजनेची माहिती दिली व मार्गदर्शन केले.तर समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय काका जाधव यांनी अनेक योजनेची माहिती देऊन लाभार्थ्यांनी कुठल्याही एजंटला एकही रुपया देऊ नये वरील सर्व योजनेचा लाभ समितीमार्फत मिळवून देण्यात येईल,अशी माहिती दिली. असता यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी त्याच गावांमध्ये दोन प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींनी 70 ते 80 वयोगटातील आजी,आजोबांचे पेन्शन योजना मंजूर करून देतो म्हणून 1700 रुपये4 वर्ष झाले घेतले असून अजूनही त्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही,असे निदर्शनास आले, त्याचबरोबर 45 वर्ष असलेले दिव्यांग व्यक्ती हे पण ,अपंगाचे  आयडी कार्ड काढण्यासाठी 2022 मध्ये ऑनलाईन करून घेतल्यानंतर सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी5000 हजाराची मागणी केली असता लाभार्थ्याकडे पैसे नसल्याकारणाने तो पैसे देऊ शकला नाही. त्यामुळे तो लाभार्थी या योजनेपासून आजही वंचित आहे. वरील सर्व लाभार्थ्यांना समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय काका जाधव यांनी आश्वासित केलं की,या सर्व योजना शासकीय नियमाप्रमाणे लाभार्थ्यांना मिळवून देऊ. असे सांगितले.व कुठल्याही एजंटला एकही रुपया देऊ नये असेही सुचित केले. या कार्यक्रमाचे आयोजन शंभुलिंग स्वामी व सतीश वह्नाजे यांनी केले. यावेळी समितीचे उपस्थित पदाधिकारी ज्योती राजपूत,वर्षा स्वामी,रेखा कोराळे व तहसीनबेगम इमडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here