ईम्बेल्लीश फीटनेस जीमचा आरोग्यदायी स्तुत्य उपक्रम ; health meet fitness

0
125

उमरगा :– शहरातील भारत विद्यालय कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या ईम्बेल्लीश फीटनेस जीमच्यावतीने दि.30 रोजी health meet fitness सारख्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमा करीता जीमचे सभासद असलेले डॉ. जयभारत भालके (कार्डीयॉलॉजिस्ट), डॉ. एन.डी. बिराजदार, (पेडीयाट्रिशन) ,डॉ. विजयकुमार बेडदुर्गे (एम-डी),डॉ. विशाल माने,डाॅ.नचिकेत इनामदार (पेडियाट्रीशन), डॉ. ऑलवीन मॅथुस (फिजीयोथेरपीस्ट ) यांनी जीमच्या सर्व सभासदांना जीमचे जे प्रशिक्षित ट्रेनर असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रमाणात व्यायाम व नैसर्गिक आहाराचे सेवन करुन नैसर्गिक रित्या उत्तम आरोग्य ठेवण्याकरीता काळजी घ्यावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी जीममधील सर्व समासदांची रक्त, लघवी, बी.पी.,शुगर आदी च्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात डॉ. विजयकुमार बेडदुर्गे यांनी मार्गदर्शनात म्हंटले की, सातत्याने जीम मध्ये येवून प्रशिक्षित ट्रेनर च्या मार्गदर्शना खाली सराव केला असता शरीरातील स्नांयूची वाढ होऊन शरीर पिळदार तर बनतेच यात शंका नाही. त्याबरोबरच आपल्या शरीरातील अंतर्गत हालचालींच्या चाचण्या वेळेच्या वेळी केल्या पाहीजे., डाॅ. एन. डी. बिराजदार यांनी सीपीआर संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.,डॉ. जयभारत भालके यांनी हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर तात्काळ प्राथमिक उपचार म्हणून पेशंट सोबत असणा-या व्यक्ती ने सीपीआर च्या माध्यमातून उपचार केला असता.काही कालावधी करीता त्या पेशंट चा जीव वाचवण्यात मदत होवू शकते त्यामुळे.बहुतेकांना सीपीआर आलाच पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन ईम्बेल्लीश जीमचे संचालक आकाश पोतदार व रविंद्र कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमास ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. आकांक्षा चौगुले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता यशवंत पाटील, देवसाळे, आदित्य, सुप्रीमा मॅडम हे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जीमचे सदस्य भागवत बामनकर यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here