उमरगा:– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, येथे दि.30 रोजी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वनाथ पटोले (मार्कसन्स फार्मा), गोपाल आवले (अजिओ फार्मासिटिकल), माधव साखरे (तुलीप लॅब प्रायव्हेट लिमिटेड), राहुल आरे (निर्माण संघटना), संतोष स्वामी यांनी मुलाखती घेतल्या. यामध्ये धाराशीव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील पदवी व पदवीका फार्मसी महाविद्यालयातील 105 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मुलाखतीद्वारे एकूण 46 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड करण्यात आली. मार्क्सन्स फार्मामध्ये 14, अजिओ फार्मासिटिकलमध्ये 17 व तुलीप लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुकी पत्र देण्यात आले. प्राचार्य महेश कदारे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.संतोष स्वामी, प्रा.अजय बेडदुर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.अशोक गायकवाड व प्रा.श्रीकृष्ण मुळे यांनी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून काम पहिले.कार्यक्रमासाठी प्राचार्य महेश कदारे, प्रा.अजय बेडदुर्गे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अंकिता यादव मानले.


