उमरगा : तालुक्यातील पेठसांगवी गावचे सुपुत्र तथा राष्ट्रीय समन्वयक युवक काँग्रेस पदी कार्यरत ,ओडीसा युवक काँग्रेस चे प्रभारी महेश देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या संघटना वाढीमध्ये दिलेल्या योगदानाची भारतीय युवक काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय बानु चिब यांनी दखल घेऊन त्यांची भारतीय युवक काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर सचिवपदी नियुक्ती केली आहे. महेश देशमुख हे मूळचे उमरगा तालुक्यातील पेठसांगवी गावचे रहिवाशी असून, ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी ओळख आहे. त्यामुळे राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून एक महत्त्वाची जबाबदारी देशमुख यांना देण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लवरू, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय बानू चिब यांचे महेश देशमुख यांनी आभार व्यक्त केले. युवक काँग्रेसला अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्नशील राहणार असल्याचे मत महेश देशमुख यांनी व्यक्त केले.


