उमरगा पोलीस विभागाचा खाक्या ; वाहनधारकांकडून 2,21,500 रुपये दंड वसूल

0
634

उमरगा :–  पोलीस विभागाने मनावर घेतल्यावर काय..काय.. घटना घडू शकतात, त्याचे परिणाम काय होतात याच्या प्रचीतीचा अनुभव दि.31 जुलै रोजी उमरगा येथील वाहनधारकांना आला यात शंका नाही कोणताही गाजावाजा न करता स्वतः पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले हे रस्त्यावर उतरून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणा-या वाहनधारकाकडून दंड वसूल करण्याकरीता पोलीस विभागाच्या टीमसह धावपळ करताना दिसत होते. दि.31 रोजी उमरगा पोलीसांनी  उल्लेखनीय कामगिरी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां 261 वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायदया अंतर्गत कारवाई करून एकुण 2,21,500 रूपये दंड वसूलीची कारवाई केली.

मागील कांही कालावधी पासुन शहरात वाहन चालक हे नियमांचे उल्लंघन करून नियम मोडुन ट्रिपल सीट, विरूध्द बाजुने वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसतानासुध्दा वाहन चालविणे, मोबाईल फोनवर बोलत वाहन चालविणे असे नियमाविरुध्द वाहन चालवित असल्यामुळे व त्यामुळे लहान मोठे अपघात होत असल्याचे निदर्शनास  आल्याने पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि.31रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 वाजण्याच्या दरम्यान विशेष मोहिम राबवुन पोलीस ठाणे समोर नाकाबंदी करून शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 रोडवर ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेटं वापरणे, विरूध्द बाजुने वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसतानासुध्दा वाहन चालविणे, मोबाईल फोनवर बोलत वाहन चालविणे असे नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणारे 191 वाहनावर ऑनलाईन कारवाई करून 1,51,500 रूपये दंड व 70 वाहन चालकांविरूध्द ऑफलाईन जी.एन पावती देवुन 60000 रू दंड असे एकुण मोटार वाहन कायदयाचे विविध कलमाव्दारे 261 वाहन चालकाविरूध्द कारवाई करून एकुण 2,21,500 रू. इतक्या रक्कमेची दंडात्मक कारवाई करून उल्लेखनीय केलेली आहे.यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालविताना मिळुन आल्यास त्यांचे पालकाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुनच वाहने चालवावेत, शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 रोडवर अस्ताव्यस्त वाहने उभी करू नये असे उमरगा पोलीस स्टेशनच्यावतीने आवाहन करण्यात आले. सदरची कामगिरी धाराशिव च्या पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक),उमरगा चे उपविभागीय पोलीस अधिकारी  सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, स.पो.नि. पांडुरंग कन्हेरे, पोउपनि चाटे, पोउपनि गजानन पुजरवाड पोहेकॉ वाल्मिक कोळी, पोहेकॉ कोनगुलवार, पोहेकॉ तावशीकर, पोहेकॉ चौधरी, पोकों भागवत घाटे, पोकों  नवनाथ भोरे, पोकों विजय मानकोळे, प्रोकॉ पुरी, पोकों आडे, यांनी केलेली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here