लक्ष्मी पाटी जवळ दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; दोघे जखमी

0
1003

उमरगा :- तालुक्यातील उमरगा – लातूर रोडवरील लक्ष्मी पाटी जवळ दुचाकी चालकाचा अचानक ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना दि.2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8.30 वाजता घडली असून, यात दोघे जखमी झाले आहेत.दि. 2 रोजी रात्री ठीक 8ः30 वाजता एकुरगा येथून उमरग्या कडे जाणारी मोटारसायकल क्रमांक MH 24 AR 2748 ही लक्ष्मी पाटी जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने मोटारसायकल स्लिप होऊन अपघात झाला. यात गिरीधर गुंडु ठाकुर वय 27 रा. एकुरगा, पृथ्वीराज प्रतापसिंग रजपुत वय- 16,राहणार अणदूर, ता. तुळजापुर हे दोघे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले.असल्याची माहिती रुग्ण वाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here