साऊ  समितीचा शासकीय योजनेची माहिती देण्यासाठी मुरूम येथे मेळावा

0
52

 

उमरगा:- तालुक्यातील मुरूम येथे  बाल संगोपन, संजय गांधी निराधार,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ , श्रावणबाळ योजना व दिव्यांग इत्यादी शासकीय योजनेची माहिती देण्यासाठी दि.2 रोजी साऊ एकल महिला पुनर्वसन   समितीमार्फत शासकीय योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला साऊ ए.म. पु. समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय काका जाधव यांनी योजनेची माहिती दिली. त्यानंतर असे निदर्शनास आले की संजय गांधी निराधार , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, या लाभार्थ्यांनी दोन ते तीन वेळेस तहसील कार्यालयामध्ये जाऊन आले असता, बऱ्याच जणांचा आधार लिंक नाही, आधार सिडिंग नसल्या कारणाने व त्यांना ओटीपी न सांगता येत नसल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचे निर्देशनास आलं जेणेकरून आता महसूल विभागामार्फत पैसेही डीबीटी मार्फतच अकाउंटला जमा होत आहेत. याचेही मार्गदर्शन करण्यात आले.यावेळेस समितीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी मेळाव्यामध्ये संजय गांधी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना चे पात्र-अपात्र लाभार्थी कसे ठरतात त्याविषयी मार्गदर्शन करून सर्वप्रथम ॲपद्वारे आधार कार्ड स्कॅन करून दाखवले व असे निर्देशन असले की बऱ्याच लाभार्थ्यांनी बसमध्ये प्रवास मोफत व्हावा म्हणून वय वाढवून डुप्लिकेट आधार कार्ड पण करून घेतले आहे. स्कॅन केलं असतं ते स्कॅन होत नाही. त्यानंतर 4 ते 5 वर्षाच्या दिव्यांगाचे आधार कार्ड स्कॅन केले असता स्कॅन होत आहे पण या लाभार्थ्याच मागच्या ठराव बैठकीमध्ये अपात्र ठरले आहे. त्यांना पण समितीमार्फत योजनेचा शासकीय नियमाप्रमाणे लाभ मिळवून देण्यात येईल. असे विजय काका जाधव यांनी आश्वासित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष  शोभा बेंगमपुरे, प्रमुख पाहुणे रविराज शिंदे, कार्यक्रमाचे आयोजन राच्यापा दुर्गे, मोहन स्वामी विभाग प्रमुख.शंभुलिंग स्वामी, ज्योती माने,वर्षा स्वामी, ज्योती पुरकर व तहसीनबेगम इमडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here