उमरगा:- धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व, जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष(भैय्या)शिवाजीराव मोरे यांनी दि. 5 ऑगस्ट रोजी विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आणि अ.अमित देशमुख यांच्याशी येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत,नगरपालिका,आणि जिल्हापरिषद या अनेक विषयावर भेट घेऊन चर्चा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच त्यांनी आगामी निवडणुकी संदर्भात पुढील महिन्यात उमरगा नगरीमध्ये होणा-या भव्य मेळाव्यासाठी येणार असल्याचा शब्द दिला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सरचिटणीस विजय वाघमारे,अश्लेष(भैय्या) मोरे मित्र मंडळ चे अध्यक्ष विशाल काणेकर,नितीन कोराळे, अमित रेड्डी,बालाजी मोरे, गणेश पाटील(उपसरपंच) ,महेश जाधव,अनिल साळूंके, विकास कोराळे आदी मान्यवर उपस्थित होते.


