मेळावा फाउंडेशनचा…. नाही तर आम्ही आलो असतो!

0
544

उमरगा :– तालुक्यातील मुरूम येथे साखर कारखाना स्थळी दि.  07 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा हा शरण पाटील फाउंडेशन द्वारा आयोजीत होता त्या कार्यक्रमाशी आमचा अथवा पक्षाचा काय संबंध भारतीय जनता पक्षाचा वैयक्तीक मेळावा असता तर तालुक्यातील जनमत असलेले तमाम पदाधिकारी, ज्यांनी पक्ष वाढीसाठी  अख्ख आयुष्य झिजवल असे कार्यकर्ते नक्कीच  संबंधित कार्यक्रमास उपस्थित राहिले असते. असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरीष्ट पदाधिका-याने उदगार काढले. हे उदगार म्हणजे खुप काही विचार करण्या जोगे होते यात शंका नाही. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत मुरूम येथील शरण पाटील फाऊंडेशन च्या वतीने AI ऊस शेतीत कशा पध्दतीने वापरायचे या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरीता शेतकरी मेळाव्याचे दि.7 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री यांच्या धाराशिव दौऱ्याच्या हिशोबाने मुरुम येथील कार्यक्रम 7:45 वाजण्याच्या सुमारास सुरु होणे अपेक्षित असताना मंत्री महोदय रात्री 10.00 वाजण्याच्यासुमारास कार्यक्रम स्थळी पोहचले व त्यांचे मार्गदर्शन साधारण 11:05  वाजण्याच्यासुमारास सुरु झाले. जे शेतकरी ऊस ऊत्पादन वाढीसाठी AI चा वापर कसा करावयाचा या संदर्भात च सखोल मार्गदर्शन ऐकण्याकरीता बसले होते त्या शेतकरी वर्गाची तर घोर निराशाच झाली असल्याची चर्चा मेळाव्यात आलेले शेतकरी करीत असल्याचे दिसले.

भाजपाचे लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष म्हंटल्यानंतर उमरगा- लोहारा तालुक्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील ज्यांनी पक्षाच्या पडत्या काळात अहोरात्र मेहनत घेवुन पक्ष वाढवला, ज्या पदाधिकारी यांच्या पाठीमागे जनमत आहे. असे भाजपाचे  कार्यकर्ते

या कार्यक्रमास येणे अपेक्षित असताना. संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी फीरकले ही नाही. तसेच त्याचवेळी मुरूम मधील भारतीय जनता पक्षाच्या उद्योगा आघाडीचे  जिल्हाध्यक्ष श्रीकांत मणियार  मुरूम शहरात उपस्थित असतानाही त्यांची कार्यक्रम स्थळी उपस्थिती नव्हती ही बाब ही विचार करण्या जोगी आहे असे बोलले जात आहे. तसेच

या मेळाव्याच्या निमित्ताने आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न असल्याची नागरिकात चर्चा आहे.कार्यक्रमाच्या स्टेजवर भाजपाचे तुळजापूर चे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, राजेंद्र पाटील हे तसेच काही प्रमाणात कार्यकर्ते बोटावर मोजण्यासारखे नेते,पदाधिकारी सोडले तर दुसरे कोणीही दिसले नसल्याची चर्चा होती. तालुक्यातील महत्वाचे जनमत असलेले पदाधिकारी यांना  या संदर्भात चर्चा केले असता त्यांचे डायरेक्ट मत होते की, हा शेतकरी मेळावा भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित नव्हता, तो फाऊंडेशन च्या वतीने आयोजित होता. जर पक्षाच्यावतीने आयोजित असता तर आम्हाला आहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी करण्याकरीता झटावे लागले असते. व तालुक्यातील एक ही कार्यकर्ता, पदाधिकारी कार्यक्रमापासून सहभाग न नोंदवता दुर राहु शकला नसता असे नाव न सांगण्याच्या अटीवर एक वरीष्ठ भाजपाच्या पदाधिकारी यांनी हे उदगार काढले आहे. म्हणजे हे वाक्य भविष्यात विचार करण्यासारखे आहेत यात शंका नाही असेच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here