उमरगा – शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट,च्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख, यांचा दि.10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्यासुमारास उमरगा येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पैगंबर शेख यांच्या समाजसेवेतील योगदानाचा गौरव करत, सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी उपक्रमांमध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची प्रशंसा करण्यात आली.या प्रसंगी राहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जाहेद मुल्ला यांनी पैगंबर शेख यांच्या कार्याची माहिती देत सांगितले की, समाजातील वंचित घटकांसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांचा समाजकार्यासाठीचा दृष्टीकोन व प्रयत्न युवकांसाठी आदर्शवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.सत्कार सोहळ्यात साजिद लादाफ, नदीम मुजावर, आमजद मणियार, अफसर मुल्ला, मुस्तफा लादाफ, इरफान चौधरी,अलाउद्दीन शेख, अशफाक शेख, चांद शेख यांच्या सह ट्रस्टचे इतर पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.


