उमरगा:- येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजु झाले नुतन पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांचा उमरगा तालुका तेली समाज सेवाभावी संघटनेच्यावतीने स्टेशनचा पदभार स्वीकारल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले. यावेळी उमरगा तालुकाध्यक्ष संतोष दादा कलशेट्टी,तालुका मार्गदर्शक तथा उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सिद्धाप्पा घोडके, परमेश्वर साखरे, उमरगा तालुका तंटामुक्त समितीचे तालुका उपाध्यक्ष महादेव साखरे, तालुका कार्याध्यक्ष सिद्धेश्वर (पिंटू)कलशेट्टी,प्रसिध्दी प्रमुख शिवकुमार दळवी, महेश कलशेट्टी , बाबुराव कलशेट्टी,दयानंद साखरे, नितीन घोडके,भीम दीक्षित आदी तेली समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते.


