“शरण पाटील फाऊंडेशन” च्या “स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल” ला महिलांचा उदंड प्रतिसाद

0
342

उमरगा:- शहरातील शांताई मंगल कार्यालय येथे “शरण पाटील फाऊंडेशन” च्या वतीने दि 16 ऑगस्ट रोजी “स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात गरीब, गरजू, विधवा महिलांना स्वत:च्या पायावर उभा राहता यावे या उद्देशाने 100 महिलांना शिलाई मशिन चे वाटप सौ. संपदा शरण पाटील,कु. श्वेता बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला उमरगा- लोहारा तालुक्यातील हजारो महिलां उपस्थित राहुल अनमोल असा उदंड प्रतिसाद दिल्याचे दर्शन याप्रसंगी दिसत होते. शरण पाटील फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अनपेक्षित असा महिलांचा प्रतिसाद पाहुण संपदा पाटील यांनी आणखीन पाच टप्प्यात गरजू, गरीब, विधवा महिलांना शिलाई मशिन चे वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासित केले.कार्यक्रमास कु.श्वेता बापूराव पाटील, लोहारा नगरपंचायतच्या माजी अध्यक्षा ज्योती दिपक मुळे,नगरसेविका सिमा हरी लोखंडे,पंचायत समितीच्या मा.सदस्या सुवर्णा भालेराव,पूजा विनय बदोले,संगिता कडगंचे,संगिता पाटील,कु.नाजमिन मुरमे,ज्योती पेठकर,प्रा.अनिता सरपे,तुलसी प्रशांत काळे,सोनाली विश्वनाथ सुर्यवंशी ,मंगला बनसोडे,अंबिका सोळसे,राणी हवेली यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्योती श्रीराम पेठकर यांनी तर कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.शौकत पटेल, मेनकुदळे,यांनी केले. ,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल सगर,महेश माशाळकर,चंद्रशेखर पवार,राहूल हेबळे,प्रशांत काळे,हरीभाऊ लोखंडे,बाबा सुर्यवंशी,गोविंद सुर्यवंशी,राजूभाई मुल्ला,सदानंद पाटील,यशपाल कांबळे,यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, कार्यक्रमा करीता उमरगा- लोहारा तालुक्यातील महिला भगिनी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here