उमरगा :– तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,उमरगा शहरातील जुन्या सरकारी दवाखानाच्या मैदानात गेल्या कांही वर्षांपासुन फळभाज्या, पालेभाज्या व विविध फळांची दररोज पहाटे लिलाव होतो, त्या ठिकाणी अतिशय दुर्गंधीत नाल्याचे सांडपाणी व सडलेल्या कच-याचा ढिगारा पसरलेला आहे. त्याच दुर्गंधीत सांडपाणी व सडलेल्या चिखलमय कच-याच्या ढिगा-यावर तालुक्यातील शेतकरीवर्ग नाईलाजास्तव आपला शेतमाल,भाजीपाला व फळे ठेवतात ज्याचा त्या ठिकाणी लिलाव होतो. शहरात उपजिल्हाधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांच्यासह बरेच अधिकारी, शासकीय व खाजगी बंगल्यात भाडयाने रहातात,त्या सर्वांच्या घरात आणि प्रत्येकांच्या घराघरात हाच भाजीपाला व फळे जातात.गलिच्छ,दुर्गंधीत नाल्यांचे सांडपाणी व सडलेल्या कच-यांचे अंश या सर्व भाजीपाल्यांवर व फळांवर नकळत येतो त्यामुळे शहरातील एकुणच सर्वांचेच आरोग्य धोक्यात आलेले आहे.यामुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेली आहे. अनेक लोक आजारी पडत आहेत,केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आरोग्याच्या कारणांमुळे आर्थिक ताण पडत आहे. सदर भाजीमंडई येथील कच-याचे ढिगारे तात्काळ काढुन नाल्यातील सांडपाण्याला मार्ग मोकळा करुन देवून,या भाज़ी मंडईमध्ये आवश्यक त्या ठिकाणी मुरुम टाकुन स्वच्छ व प्रशस्त जागा भाजी मंडईसाठी तत्परतेने तयार करुन देण्यात यावी अशी विनंती या निवेदनात कारण्यात आली आहे.तसेच राज्यातील इतर शहरांतील भाजीमंडईमध्ये, जिथे शेतक-यांकडून कमिशन न घेता व्यापा-यांकडून कमिशन घेतले जाते पण उमरगा शहर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे जिथे,या मंडईत येणा-या शेतक-यांकडुन दहा टक्के कमिशन येथील आडती घेत आहेत.शेतक-यांची दररोज आर्थिक लुट या भाजी मंडई येथे होत असुन ही लुट तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी कारण्यात आली आहे. सदर मागण्या तत्परतेने मान्य नाही झाल्यास दि.1 सप्टेंबर, 2025 रोजी तहसील कार्यालय, उमरगा समोर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येनार असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, मयुरीताई पैलवान,रोहिदास वाघमारे,राजेंद्र येवते,मौला बागवान,सिद्दीक मकानदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदर निवेदनाच्या प्रति पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपाविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे यांनाही देण्यात आल्या आहेत.


