कोरेगाववाडी येथील शिवाई शैक्षणिक संकुलात कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

0
93

उमरगा :- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील  शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे दि.16 ऑगस्ट रोजी  कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा राबवण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, प्रमुख वक्ते म्हणून प्रॉक्टर अँड गॅम्बल जिल्हा व्यवस्थापक, प्रशिक्षक सुरज जावळेकर, संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे उपस्थित होते.यावेळी सुरज जावळेकर यांनी समाजामध्ये वावरत असताना व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेले आहेत, सर्वोत्तम छाप पाडण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, व्यक्तिमत्व विकास वाढवणे खूप गरजेचे आहे.प्रभावी संवाद, सकारात्मक मानसिकता विद्यार्थी जीवनामध्ये महत्त्वाची आहे असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य अल्विन काळे, प्राचार्य महेश कदारे, डॉ.स्नेहल धर्माधिकारी, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड, प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा. चनबस शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोनिका धुरे व आभार प्रदर्शन प्राचार्य महेश कदरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here