उमरगा:– शहरापासून जवळच असलेल्या लातूर- उमरगा रोडवरील चिंचोळे यांच्या वीट भट्टी जवळ दुचाकी- कारचा अपघात होऊन पती- पत्नी दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दि.20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्यासुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त दि. 20 रोजी लातुर- उमरगा रोडवरील चिंचोळे यांच्या विटभट्टी समोर कार व दुचाकी चा अपघात होऊन पती कीरकोळ तर पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. एकुरगा वाडी येथुन उमरग्याच्या दिशेने जाणारी दुचाकी व समोरून येणाऱ्या कार ने जोराची धडक दिली. या अपघातात ओमप्रकाश व्यंकट पाटील वय- 50 , सुनिता ओमप्रकाश पाटील ,वय -40 दोघे रा. एकुरगा वाडी हे जखमी झाले असुन सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.असल्याची माहिती रुग्ण वाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.


