उमरगा :– तालुक्यातील नारंगवाडी येथे बुधवार दिनांक २० रोजी ग्रामपंचायत कार्यालय नारंगवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अनेक ठराव संमत करण्यात आले तसेच तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी एकूण चार उमेदवार उभे होते इच्छुक ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यानंतर ग्रामसभेमधून मतदानाद्वारे तंटामुक्ती अध्यक्ष निवडण्याचे निर्णय घेण्यात आला त्यानुसार मतदान घेण्यात आले त्यामध्ये तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड करताना आकाश भालचंद्र पवार व हनमंत सांगवे या दोघांना यांना समान ७७ मते पडले आणि बाकीच्या दोन उमेदवारांना ८ व १४ अशी मते मिळाली एकूण १७६ मतदानापैकी दोघांना ७७ मतदान आकाश भालचंद्र पवार व हनमंत महादेव सांगवे यांना मिळाल्यामुळे त्यांची अध्यक्ष पदी निवड करणे कठीण झाले. नंतर चिट्टी टाकून आकाश भालचंद्र पवार यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व हनमंत महादेव सांगवे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना पदाचा भार सोपवण्यात आला यावेळी गावचे पोलीस पाटील हेमंत पाटील यांच्या हस्ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी सरपंच शेखर घंटे उपसरपंच कुमार बापू पवार ग्रामसेवक जगदीश जाधव श्रीधर सांगवे ,लखन जाधव ग्रामपंचायत पंचायत सदस्य संजय पवार, रघु आष्टे , चंदु मुळे, खंडू पवार, प्रशांत कांबळे, बंडु पवार, मुकेश आष्टे, प्रवीण कारागीर,प्रशांत सांगवे , मनोज पवार,राहुल मुगळे , अर्जुन पवार, किशोर सांगवे, हणमंत पवार, गणेश कोकाटे ,पांडुरंग पवार, दीपक पवार आदी नागरिक उपस्थित होते


