सोन्याच्या दरात पुन्हा एकदा जोरदार तेजी पहायला मिळत आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. गेल्या 15 दिवसांत सोन्याच्या दरात 5000 रुपयांहून अधिक घसरण झाली.
त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर काय आहेत.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी (15 नोव्हेंबर 2024) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,56,500 रुपयांवरुन 7,57,600 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 75,650 रुपयांवरुन 75,760 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 6,93,500 रुपयांवरुन 6,94,500 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर 69,350 रुपयांवरुन 69,450 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
18 कॅरेट सोन्याच्या दरात 800 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 5,67,400 रुपयांवरुन 5,68,200 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर 56,740 रुपयांवरुन 56,820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.