उमरगा :- शहरातील ज्ञानज्योती अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा वाचनालय येथे विविध स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.सध्याचे युग हे स्पर्धेचे असुन ज्ञानज्योतीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या जिदद व चिकाटीचे फळ मिळाले आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांची वाटचाल सोपी करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आत्मविश्वास व एकाग्रतेने यश मिळवावे. जो विद्यार्थी सातत्याने कष्ट घेतो तो कोणत्यातरी परीक्षेत हमखास यश मिळवतोच. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा गरजु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेखाताई सुर्यवंशी यांनी केले. ज्ञानज्योती अभ्यासिकेतील यशस्वी विद्यर्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्ञानज्योती सामाजिक बहुउददेशीय संस्था, उमरगा यांच्या वतीने तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था उमरगा यांच्यासमवेत उमरगा शहरातील आरोग्य नगरी येथील शिक्षक पतसंस्था कॉम्प्लेक्स, येथे मागील 5 वर्षांपासुन मोफत ज्ञानज्योती अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा वाचनालय केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट, संगणक, फाय-फाय आदी सर्व आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याठिकाणी अभ्यास करून शासकीय नोकरीस रुजु झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दि.23 रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा चौगुले व प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणुन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या रेखाताई सुर्यवंशी, वैष्णवी सुरवसे यांच्या उपस्थिती होती. ॲड.आकांक्षा चौगुले यांनीही यावेळी यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यावेळी कु.सुषमा देसाई (महसुल सहाय्यक), सुप्रिया गायकवाड (कर सहाय्यक) तर तनुजा राजपुत (विद्युत सहायक), राजनंदिनी घोडके (विद्युत सहायक) व अजित बाभळसुरे (विद्युत सहायक) या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिलेश बिराजदार, सुत्रसंचलन स्नेहा पवार व आभार प्रदर्शन शिल्पा जाधव यांनी केले.
Home आरोग्य व शिक्षण स्पर्धा परिक्षा उत्त्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव तरुणाईला प्रेरणा — रेखाताई सुर्यवंशी


