उमरगा पोलीसांचा नव तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर ;  संवेदनशील गुन्हयातील 02 आरोपी जेरबंद

0
839

उमरगा :- येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी व त्यांच्या सहकारी अधिकारी, अंमलदार, कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल अत्यंत संवेदनशील अशा खुना च्या गुन्ह्यात कोणताही सक्षम पुरावा उपलब्ध नसताना नव तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करून गुन्ह्यातील 02  आरोपींना  जेरबंद करण्यात यश प्राप्त झाले आहे ही बाब उमरगा पोलीसां करीता कौतुकाची.

सविस्तर वृत्त, दि.25 जुलै रोजी कालीदास संभाजी शिंदे रा. मुन्शीप्लॉट उमरगा यांनी पो.स्टे. उमरगा येथे येवुन त्यांचा मुलगा अभिषेक कालीदास शिंदे वय 23 वर्षे रा. मुन्शीप्लॉट उमरगा हा दि. 24/07/2025 रोजी 19:00 वा. पासुन बेपत्ता झाले बाबत तक्रार दिल्याने दुपारी 16:41 वा. मिसिंग नंबर 33/2025 अन्वये दाखल करून त्याची चौकशी पोहेकॉ/1146 कोळी यांचेकडे दिला. सदर मिसिंग चौकशी दरम्यान दि.25/07/2025 संध्याकाळी 19:00 वा.सु. पो.स्टे. उमरगा येथे डायल 112 वर माहिती मिळाली की, उमरगा शिवारातील अंकुश शिंदे यांचे शेताजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 बायपास रोड लगतचे खड्ड्‌यातील झुडुपामध्ये  अभिषेक कालीदास शिंदे वय 23 वर्षे रा. मुन्शीप्लॉट उमरगा याचा मृतदेह पडले असलेबाबत माहिती मिळाल्याने पोहेकॉ व्ही. ए. कोळी यांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी करून मृतदेह उपजिल्हा रूग्णालय उमरगा येथे आणुन मयताचे प्रेताचे इन्क्वेस्ट पंचनामा करून मयताचे प्रेताचे वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन शवविच्छेदन करून घेवुन सदर प्रकरणात मयताचे वडील कालीदास संभाजी शिंदे रा. मुन्शीप्लॉट उमरगा यांचे खबर जबाब वरून दि. 26/07/2025 रोजी अ.मृ.नं.72/2025 कलम 194 भा.ना.सु.सं. प्रमाणे अ.मृ. दाखल करण्यात आले. अ.मृ. चौकशी मध्ये वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रूग्णालय उमरगा यांना मरणाचे कारणाबाबत अभिप्राय विचारला असता यातील मयताचा धारदार हत्याराने जखमा झालेने त्याचा मृत्यु झाला बाबत अभिप्राय दिल्याने दि. 09/08/2025 रोजी मयताचे वडील कालीदास संभाजी शिंदे रा. मुन्शीप्लॉट उमरगा यांनी दिलेल्या तक्रारी वरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं. 506/2025 कलम 103 (1), 3 (5) भा.न्या.सं प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. फिर्यादी यांनी  सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे वय 41 वर्षे, रा. एकोंडी रोड उमरगा ह.मु. महाकाली कलाकेंद्र येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव, 2) अनिता सतिश जाधव वय 35 वर्ष रा. डिग्गी रोड उमरगा ह.मु. महाकाली कलाकेंद्र येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव व 3) रेणुका उर्फ रूपाली सुर्यकांत पवार वय 33 वर्ष रा. माडज ता. उमरगा, ह.मु. महाकाली कलाकेंद्र येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचेवर संशय व्यक्त करून त्यांनीच यातील मयताचा खुन केल्याची तक्रार दिल्याने गुन्हयाचे तपासात 1) सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे, 2) अनिता सतिश जाधव, 3) रेणुका उर्फ रूपाली सुर्यकांत पवार यांना दि. 10/08/2025 रोजी सदर गुन्हयात अटक करून त्यांची दि.15/08/2025 पावेतो पी.सी.आर घेवुन गुन्हयाचा तपास केला असता सदर महिला आरोपी पैकी सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे ही मयत अभिषेक शिंदे याचेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. यातील मयत हा दारू पिवुन तिला सतत त्रास देत असल्याने ती त्यास सोडुन तिच्या बहिणी सोबत महाकाली कला केंद्र येरमाळा येथे राहत असुन अभिषेक शिंदे याचे अमोल कावारे याचे सोबत यापुर्वी भांडण तक्रारी होवुन हाणामारी झाले होते असे अटक महिला आरोपी यांनी तपासात सांगितले. तेंव्हा अमोल कावारे यास चौकशीकरीता बोलावुन घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दि.24/07/2025 रोजी संध्याकाळी त्याचे रिक्षामध्ये प्रवाशी घेवुन सास्तुर येथे गेलो असता रात्री 20:30 वा. सु, अक्षय राजाराम सारोळे वय 22 वर्षे रा. बैंक कॉलनी उमरगा यांने मोबाईलवर कॉल करून मी अभिषेक शिंदे यास मारून टाकले आहे असे सांगितल्याची महत्वपुर्ण माहिती दिली. त्यानंतर तपासात अक्षय राजाराम सारोळे रा. बॅक कॉलनी उमरगा यास चौकशीकरीता ताब्यात घेवुन त्याचे मोबाईल नंबरचे सीडीआर हस्तगत करून प्राप्त सीडीआर व आरोपीचे मोबाईल मधील गुगलमॅप मधील टाईमलाईन चेक करून तुलनात्मक विश्लेषण करून तपास केला असता अक्षय सारोळे याचे लोकेशन घटनेच्यावेळी घटनास्थळावरच असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि. 19/08/2025 रोजी अटक करून त्याची दि. 25/08/2025 पर्यंत पी.सी.आर घेतली असुन पी.सी.आर मध्ये अटक आरोपीस पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्हयाची कबुली देवुन तो व त्याचा साथीदार संदिप मधुकर लोहार वय 24 वर्षे रा. सुविधा हॉस्पीटलचे पाठीमागे उमरगा असे दोघे मिळून यातील मयत अभिषेक शिंदे याचा खुन केल्याचे कबुल केले. तपासात आरोपी संदिप मधुकर लोहार याचा मोबाईल लोकेशनव्दारे शोध घेतले असता तो कोल्हापुर येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास कोल्हापुर येथील कागल एमआयडीसी येथुन ताब्यात घेवुन त्यास दि.22/08/2025 रोजी सदर गुन्हयात अटक करून त्याची दि. 26/08/2025 पावेतो पी.सी.आर दिले असुन तपासात सदर आरोपीने दि.24/07/2025 रोजी तो व त्याचा मित्र अक्षय सारोळे, व मयत अभिषेक शिंदे असे मिळुन ऐश्वर्या बार उमरगा येथे एकत्रित दारू पित असताना मयत अभिषेक यांने अक्षय व संदिप यास शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या दोघांना अभिषेकचा राग आल्याने त्यास दारू पाजवुन

स्कुटीवर बसवुन घटनास्थळी घेवुन जावुन तेथे मयत यास कार (धारदार) दगडाने डोकीत, गळ्यावर व इतर ठिकाणी वार करून त्यास जिवे ठार मारून त्याला रोड साईडचे खड्‌डयात फेकुन तुळजापुर, सोलापुर मार्गे कोल्हापुर येथे पळुन गेल्याचे सागितले.सदर गुन्हयाचे तपासात मयत अभिषेक कालीदास शिंदे याचा खुन कोणी केले याबाबत कांहीएक पुरावा नसताना देखील उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा दाखल झाल्यापासुन अहोरात्र संशयीतांचे मोबाईल सीडीआर, सिसिटीव्ही फुटेज व आरोपींचे मोबाईलमधील गुगल मॅप टाईम लाईन असे तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करून मयताचा खुन करणारे मुख्य आरोपी अक्षय राजाराम सारोळे वय 22 वर्षे, रा. बैंक कॉलनी उमरगा व संदिप मधुकर लोहार वय 24 वर्षे रा. सुविधा हॉस्पीटलचे पाठीमागे उमरगा निष्पन्न करून त्यांना सदर गुन्हयात अटक करून सदर गुन्हयाचा उकल केला आहे. सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीत असुन गुन्हयाचा तपास सपोनि श्रीकांत भराटे हे करीत आहेत.सदरची कामगिरी  प्रभारी पोलीस अधीक्षक  शफकत आमना ,उमरगा चे उपविभागीय पोलीस अधिकारी  सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी, सपोनि श्रीकांत भराटे, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि रामहरी चाटे, पोहेकॉ चैतन्य कोनगुलवार, पोना  यासीन सय्यद, पोना अनुरूद्र कावळे, पोकॉ नवनाथ भोरे यांनी केलेली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here