भारतीय ऑटोमोबइल इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री असल्यामुळे फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील ऑटो कंपनीज भारतात आपल्या कार्स लाँच करत असतात. काही वेळेस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार ऑफर्स सुद्धा कंपनीकडून आपल्या कार्सवर दिल्या जातात.
सध्या भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढताना दिसत आहे.
वाढत्या पेट्रोल, डिझेल, आणि सीएनजीच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कार्स खरेदी करण्याकडे आपला कल दर्शवित आहेत. आता लवकरच एक विदेशी इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी भारतात आपले पाय रोवण्यास सज्ज होत आहे. ही कंपनी व्हिएतनाममधील असणार आहे.
व्हिएतनामची सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी Vinfast भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी आपली अनेक दमदार आणि इलेक्ट्रिक वाहने भारतात आणू शकते, ज्यात कार, बाइक ते स्कूटर यांचा समावेश असू शकतो. त्यांचे सर्व फ्लॅगशिप 6-7-8-9 यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.
Vinfast ही वाहने 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये आपली वाहने सादर करू शकते. VinFast च्या भारतात प्रवेश केल्याने, ते जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या वाहन उद्योगात प्रभाव पाडू शकते. त्याच वेळी, कंपनीने देशांतर्गत बाजारपेठ म्हणजेच व्हिएतनाममध्येही आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.