उमरगा :- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे गणेश उत्सवानिमीत्त दि.29 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांनी रक्तदान करून शिबीराची सुरुवात केली. यावेळी 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्याने शरीर निरोगी राहते. हृदयाचे रोग कमी होण्यास मदत होते. कॅलरीज कमी होण्यास मदत होते.रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते. नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही, त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात असे यावेळी डॉ. विजय बेडदुर्गे यावेळी म्हणाले. याशिबिरासाठी श्रीकृष्ण रक्त केंद्राचे विजयकुमार केवडकर, योगेश सोनकांबळे, ऋतिक म्हेत्रे, स्वप्नील देशमुख व कौस्तुभ दिवेगावकर यांचे सहकार्य लाभले. शिबीरासाठी प्रा.श्रीकृष्ण मुळे व अमोल बिराजदार यांनी संयोजक म्हणून काम पहिले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.अल्वीन काळे, डॉ. स्नेहल धर्माधिकारी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा.किर्ती आर्य, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.धनश्री भुजंगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


