मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील उमरगा चौरस्ता येथील अशोक लिल्यांड शोरूम जवळ अपघात; एक गंभीर जखमी 

0
787

उमरगा:- शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई- हैद्राबाद महामार्गावरील  चौरस्ता येथील अशोक लिल्यांड शोरूम समोर एका दुचाकीस अज्ञात वहानाने धडक  देऊन पसार झाला असून, या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 29 रोजी घडली आहे.

सविस्तर वृत्त दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता मुंबई- हैद्राबाद रोडवर असलेल्या अशोक लील्यांड शोरुम जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पसार झाले. सदर दुचाकी क्रमांक MH24W 4581 ही जकेकुर कडुन उमरग्याकडे जात होती.या अपघातात दुचाकी चालक विश्वजीत रवी गायकवाड वय 28 रा. जकेकुर हा गंभीर जखमी झाला असून,  अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे आहोरात्र अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले . असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here