बौद्ध धम्माचे काम गतीने होण्यासाठी  उर्गेन संघरक्षीतानी  पोषक वातावरण निर्माण केले– धम्मचारी ज्ञानपालीत

0
28

उमरगा :– डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाना नंतर उर्गेन संघरक्षीतांनी बौद्ध धम्माच्या चळवळीसाठी महान काम केले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातील जागतिक बौद्ध संघाची स्थापना केली आहे.बौद्ध धम्माचे काम गतीने होण्यासाठी त्यानीं पोषक वातावरण निर्माण केले असल्याचे प्रतिपादन धम्मचारी ज्ञानपालीत यांनी केले.शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात बुधवारी दि२७ रोजी भन्ते संघरक्षीत यांच्या जन्म शताब्दी महोत्सवाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धम्मचारी ज्ञानपालीत, बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर धाराशिवचें चेअरमन धम्मचारी रत्नपालित होते या कार्यक्रमास धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी विबोध,धम्मचारी जिंनघोष, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आनंद कांबळे,धम्मचारी धम्मभूषण,सुमित कोथिंबीरे, यांची उपस्थिती होती.प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर, उर्गेन संघरक्षित,तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.धम्मचारी विबोध,धम्ममित्र जी.एल.कांबळे यांनी गीत गाईले,पाली पूजा घेण्यात आली.पुढे बोलतांना ज्ञानपालित म्हणाले की,१९५० साली महाबोधी सोसायटीच्या पाक्षिकात लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या लेखात डॉ बाबासाहेब म्हणतात नवा धम्म सेवक निर्माण केला पाहिजे,मीशनरी पद्धतीने धम्माचे कार्य केले पाहिजे,जागतिक संघ निर्माण केला पाहिजे म्हणून त्यानीं देश विदेशात धम्माचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करून नव दीक्षितांना धम्म शिकविण्यासाठी धम्म प्रशिक्षणाचे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे कार्य अविरतपणे चालू आहे.सध्या जगभरात ५२ देशांमध्ये धम्मप्रशिक्षणाचे कार्य नियोजनबद्ध पध्दतीने सुरु आहे.आपण शरण गमन करतो म्हणून बौद्ध आहोत.संघरक्षितानी सर्व बौद्ध शिकवणींचा अभ्यास केला व सोप्या पद्धतीने जगापुढे मांडला.त्यांनी ‘सर्व्हे आॕफ बुद्धीझम’,’आर्य अष्टांगिक मार्ग’हीपुस्तके,कविताचें लेखन केले. त्यांनी शरण गमनाला प्रथम स्थान दिले आहे.बुद्ध धम्म संघाला आत्मसात करणे व त्या प्रमाणे आचरणात आणणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.या वेळी प्रथम संस्थेच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ऑक्सिजन किट देण्यात आले तर चाइल्ड ड्रीम संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कुलबॅग चें वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे खुमासदार पद्धतीने सूत्रसंचालन धम्मचारी धम्मभूषण यांनी केले. आभार धम्मचारी रत्नपालित यांनी मानले.राहो सुखाने हा मानव इथे’या मैत्रीगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील धम्ममित्र अजय गायकवाड,अभिजीत कांबळे,हरिदास कांबळे,प्राचार्य महादेव भोसले,तानाजी कांबळे,उत्तमराव गायकवाड ,प्रिती मनोहर,तेजस्वीनी गायकवाड,मंदा टिळे,प्रा.मनोज गायकवाड,वगरसेन कांबळे, धीरज कांबळे, मिलिंद कांबळे,संतोष दलाल आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here