उमरगा : मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनाला मुस्लिम समाजानेही ठाम पाठिंबा द्यावा, असे आवाहन समाजसेवक खाजा मुजावर यांनी केले आहे.मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊन मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मराठा समाज हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आपण त्यांचे मावळे म्हणून काम केले आहे. आज त्यांच्या हक्कांच्या लढ्यात आपण खांद्याला खांदा लावून उभे राहणे ही काळाची गरज आहे,असे मत व्यक्त करत त्यांनी मुस्लिम समाजातील सर्वांनी बैठका घेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. आरक्षणाचा हा प्रश्न केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नसून, तो समाजासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवले गेलेले मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण नाकारण्यात आले आहे त्यामुळे सर्व समाजांनी एकत्र येऊन या लढ्याला बळ द्यावे लागेल त्याशिवाय हे सरकार झुकणार नाही. त्यासाठी मुस्लिम समाजाने फक्त पाणी, जेवण वाटून पाठिंबा देण्यापेक्षा बैठका घेऊन मुंबई घुसून मराठा बांधवाच्या खांद्याला खांद्या लावून लढाईला बळ द्यावं असे आवाहन मुस्लिम समाजाला करण्यात आले आहे.


