No Dolby- No DJ उपक्रमाला सहकार्य  करा — पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी

0
190

उमरगा:– शहरातील विविध ठिकाणी श्री गणेश मुर्ती ची प्रतीष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली असून,परंपरेनुसार ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, भजन, कीर्तन, गजर व आरती यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केल्यास उत्सवाला अधिक धार्मिक,सांस्कृतिक स्वरूप प्राप्त होते.  सर्व शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी , No Dolby- No DJ या उपक्रमाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततामय आरोग्यदायी व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तालुकावाशी यांना दि 31 ऑगस्ट रोजी केले आहे. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर प्रतीक आहे. समाजातील बंधुभाव, भक्तीभाव व सामाजिक सलोखा जपण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतो. तथापि, मागील काही वर्षांत या उत्सवामध्ये डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम व लेझर लाईट्स यांचा अतिरेकाने वापर होत असल्याचे दिसून येते. या कृत्रिम साधनांमुळे उत्सवाच्या पवित्रतेवर परिणाम होत असून, त्याचे काही तोटे समाजापुढे उभे राहतात.मोठ्या आवाजातील डॉल्बी किंवा डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर, विशेषतः लहान मुले, व्यक्ती आणि रुग्ण यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. कानांना त्रास, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे यासारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय शालेय विद्यार्थी व अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होतात. परंपरेनुसार ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, भजन, कीर्तन, गजर व आरती यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केल्यास उत्सवाला अधिक धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त होते. म्हणूनच सर्व नागरिकांनी, No Dolby- No DJ या उपक्रमाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततामय आरोग्यदायी व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here