पेठ सांगवी साठ तलाव भरले तुडुंब; ग्रामपंचायत च्यावतीने सांडव्याची पूजा 

0
197

 

उमरगा :– तालुक्यातील पेठ सांगवी येथे मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे तसेच तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तलाव तुडुंब भरल्यामुळे सरपंच प्रतिनिधी शब्बीर मुजावर यांच्या हस्ते सांडव्या सह जल पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच सिराज शेख, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, गिरमल दलाल, माझी सरपंच प्रतिनिधी धनराज सुभेदार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.येथील साठवण तलाव हे पेठसांगवी गावासाठी जल संजीवनी असून, या  तलावातील  पाण्यावरच नवीन पेठ सांगवी गावाचे जल जीवन व्यवस्थीत सुरू आहे. त्यामुळे येथील साठवण तलाव पावसाळ्यात भरणे अत्यंत गरजेचे असते.एखाद्या वर्षी जर तलाव न भरले तर त्यावर्षी पेठ सांगवी गावात भयानक पाणी टंचाई जाणवत असते.त्यामुळे तलाव तुडुंब भरल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तलावाचा सांडवा भरुन वाहत असल्यामुळे, दरवर्षी प्रमाणे सांडव्याची पूजा गावचे सरपंच प्रतिनिधी शब्बीर मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सिराज शेख, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, गिरमल दलाल, माझी सरपंच प्रतिनिधी धनराज सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here