उमरगा:– धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष (भैय्या) मोरे हे त्यांच्या सहकाऱ्यां सोबत मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण स्थळी मनोज जरांगे पाटील यांची व्यासपीठावर जाऊन भेट घेऊन तब्येतीची चौकशी करून मराठा आरक्षणाला स्वतः चा तसेच काॅंग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे लेखी पत्र देऊन पाठिंबा दि. 01 सप्टेंबर रोजी जाहीर केला व तसेच आंदोलकासाठी 10000 हजार शुध्द पिण्याच्या पाणी बाॅटलची व्यवस्था केली .

दि.31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उमरगा येथून अश्लेष भैय्या मोरे रवाना झाले. दि.01 सप्टेंबर रोजी मुंबई येथे दाखल होताच. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आझाद मैदानावर जाऊन मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांची व्यासपीठ स्थळी तब्येतीची विचारपूस करून स्वतः चा तसेच काॅंग्रेस पक्षाचा लेखी पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला. आंदोलनात सहभागी समाज बांधवाकरीता 10000 पिण्याच्या पाणी बाॅटलची व्यवस्था केली.याप्रसंगी उमरगा तालुका काँग्रेस चे तालुकाध्यक्ष अर्जुन (भाऊ)बिराजदार,अश्लेष भैय्या मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर, नितीन कोराळे,विराज मोरे, अनिल सुर्यवंशी, महेश जाधव, संभाजी ब्रिगेड चे अण्णासाहेब पवार आदि कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.


