उमरगा:– शहरातील कार्ले प्लॉट व समता नगर परीसरात नविन पाणी पुरवठा पाइपलाइन करीता रस्ते खोदण्यात आले असून, यामुळे परीसरातील नागरिकांना वावरण्या करीता नाहक त्रास होत आहे.वयोवृध्द नागरिकांना, लहान बाळांना खूप त्रास होत आहे.यामुळे नगरपरिषद प्रशासने तात्काळ दखल घेवून रस्ता दुरुस्त करून द्यावा अन्यथा यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरपरिषद प्रशासनाला कार्ले प्लॉट व समता नगर येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात दिनांक 3 सप्टेंबर रोजी दिला आहे.नगर परिषद च्यावतीने कार्ले प्लॉट व समता नगर वसाहतीमध्ये पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, सद्य स्थीतीत असलेल्या रस्त्याचे काम काही महिन्यापुर्वीच खुप मोठ्या प्रयत्नाने झाले होते. पाईपलाईनचे खोद काम सदरील रस्ता होण्यापुर्वी करायला हवा होता .तसे न झाल्यामुळे रस्त्यासाठी लागलेला निधी पूर्ण व्यर्थ गेला आहे आणि नविन झालेला रस्ता पुर्णपणे उखडून गेला आहे. नवीन पाईपलाईनच्या अंदाजपत्रकामध्ये खोदकाम केल्यानंतर तेवढेच काँक्रटीकरण करणे असे नमुद असताना संबंधीत कंत्राटदार तशाप्रकारे काम करत नसुन आपण त्यावर कसलीही कार्यवाही करत नसुन त्याउलट त्यांना तशी बिले अदा करत आहात म्हणुन आपण तात्काळ दखल घेवून परीसरातील रस्ते दुरुस्त करावे अन्यथा यापेक्षा ही मोठ्याप्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे.निवेदनावर सुनिता नंदू साखरे,सविता भरत हिंडोळे,मंगल मंगे,फुलाबाई जाधव,सुशीलाबाई हडपत,अण्णपुर्णा मोरे,भिमा तुकाराम धुमाळ,सुरज मोरे,सोनू होळकर, गौरव माकणीकर, नरेश माधळे, संदीप विठ्ठल जाधव, ओमकार साखरे, विनोद सगर, सुधाकर हिंडोळे यांच्या सह्या आहेत.


