बलसुरच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सत्यनारायण जाधव

0
69

उमरगा :– तालुक्यातील बलसुर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सत्यनारायण जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून रशीद अमीन शेख व संभाजी गणपती बिराजदार यांची एकमताने दि.3 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली.

दि. 03 सप्टेंबर रोजी वार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित हनुमान मंदिर येथे ग्रामसभा सरपंच सौ अश्विनी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून सत्यनारायण इंद्रजीत जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून रशीद आमीन शेख व संभाजी गणपती बिराजदार यांची एकमताने उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा यथोचित सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत बलसुर चे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष व गावातील ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here