उमरगा :– तालुक्यातील वरनाळ येथील सुपुत्र तथा प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील प्राचार्य उल्हास घुरघुरे यांना रोटरी क्लब मुरूम सिटी तर्फे दिला जणांना 2025- 26 चा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी रत्नमाला मंगल कार्यालय मुरूम येथे अलका कुबल या सिने अभिनेत्रीच्या हस्ते सायंकाळी 4:30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकी, विचारांची सत्त्वता आणि प्रेरणादायी संघर्षमय जीवनप्रवास यांचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे कार्य होय.त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्याबद्दल त्यांचे संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक आधारस्तंभ माजी राज्यमंत्री बसवराज पाटील साहेब, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम अध्यक्ष बापूराव पाटील , उमरगा जनता बँक चेअरमन तथा संचालक शरण बसवराज पाटील, व संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव यांनी व सर्व संचालक,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,आदिनी अभिनंदन केले आहे.


