उमरगा :- तालुक्यातील कदेर गावातील शिवबा नगर येथील शिवनेरी नवतरुण गणेश मंडळ व ग्रुप ०७ यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण, किर्तन अशा लोकोपयोगी उपक्रमाचं आयोजन करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.गावातील ग्रुप ०७ आणि शिवनेरी नवतरुण गणेश मंडळ शिवबा नगर कदेर यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले; तसेच वारकरी संस्कृती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी ह.भ.प वैष्णवी ताई भुसाळे यांच्या किर्तन सेवेचा कार्यक्रम मंजुळा मंगल कार्यालय येथे पार पडला.आताच्या घडीला गणेशोत्सव म्हटलं की आतिषबाजी , फटाके ,डीजे अशा प्रदूषण घडवणाऱ्या गोष्टींना फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा, किर्तन सेवेतून वारकरी संस्कृती जोपासण्याचा छोटासा प्रयत्न शिवनेरी नवतरुण गणेश मंडळ आणि झाडे संवर्धनात नावाजलेला ग्रुप ०७ अशा दोघांचं कौतुक गावकऱ्यांतून होत आहे.


