उमरगा:– भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरग्याच्या नियमित प्राचार्य पदी प्रा. डॉ. संजय अस्वले यांची विद्यापीठ निवड समिती मार्फत निवड झाली. या निवडी बद्दल भारत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने डॉ. संजय अस्वले यांचा सत्कार भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, सचिव पद्माकरराव काका हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे, संचालक प्रा. सुरेश दाजी बिराजदार, सुनील भाऊ माने, शेषराव पवार तात्या, यांच्या हस्ते आणि संस्थेचे संचालक भानुदास रावजी माने, तानाजी फुगटे, दिगंबर बिराजदार, विठ्ठलराव नरसाळे, अशोकराव पाटील, राजेंद्र माने, रमेश बिराजदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. संस्थेच्या मीटिंग हॉल मध्ये झालेल्या सत्कार कार्यक्रमात संस्थेच्या वतीने गुणवत्तेच्या शिक्षणावर भर द्यावा आणि 65 वर्ष जुन्या महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवा असा शुभेच्छा संदेश नव नियुक्त प्राचार्य डॉ अस्वले याना संस्था अध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालक मंडळ यानी दिला.डॉ. अस्वले यानी महाविद्यालयात रुजू झाल्यापासून महाविद्यालयास CPE दर्जा प्राप्त करून देण्यात, नॅक बेंगलोरच्या च्या 2004 पासून मूल्यांकन आणि मानांकन प्रक्रियेमध्ये सातत्याने काम करीत 2022 मध्ये महाविद्यालयाला नॅक चा ‘अ’ दर्जा मिळवून देण्यात समन्वयक म्हणून सिंहाचा वाटा आहे. तसेच महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रोजगार मेळावा, आणि विविध सामाजिक उपक्रमात महाविद्यालयाच्या सहभाग नोंदवला आहे.महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाविद्यालयाला सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयाचा दर्जा मिळवून दिला आहे.त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 165 संशोधन पेपर , दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. एक पेटंट सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहे. त्यांच्या संशोधन मार्गदर्शन अंतर्गत 15 विद्यार्थ्यांना एम. फिल. तर 14 विद्यार्थ्यांना पी.एचडी. प्राप्त झाली आहे. तसेच 26 एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे, सरचिटणीस जनार्दनराव साठे, संचालक प्रा. रवींद्र गायकवाड, त्रिंबकराव इंगोले, रामराव इंगोले, डॉ. विजय पाटील, अजिंक्य मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.
Home आरोग्य व शिक्षण प्रा.डॉ.संजय अस्वले यांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय च्या नियमित प्राचार्य पदी निवड


