उमरगा :- सामाजिक परिवर्तनासाठी कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, हीतासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन, बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडवण्यासाठी, सामाजिक चळवळ प्रबळ करणे गरजेचे आहे. चळवळीच्या माध्यमातूनच आपले अस्तित्व निर्माण होऊ शकते. आपलं अस्तित्व आहे तर किंमत आहे आणि ते करण्यासाठी सामाजिक परिवर्तन घडवून समाजात चळवळ प्रभावीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ प्रखरतेने राबवली पाहिजे.धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे संयुक्त सेक्रेटरी, राजाभाऊ ओहोळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी हरीश डावरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बाबासाहेबांच्या विचारांची ही चळवळ आहे. ती निस्वार्थपणे करायला हवी, आरपीआय सारख्या स्वाभिमानी पक्षाचे, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम पण स्वाभिमानाने करायला पाहिजे. धाराशिव जिल्ह्याच्या आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे कार्य पक्षाच्या माध्यमातून रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचे आहे असे सांगून ” राग सांभाळून ठेवा राख झाली या घराची, यार हो लढाई संपली नाही अजून बाबासाहेब आंबेडकरांची !” या शाहिरीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चळवळी चा संदेश दिला. यावेळी मराठवाडा अध्यक्ष पोपटराव लांडगे, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा मस्के, मारुती खरवे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस के गायकवाड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून एस के गायकवाड यांनी, रिपब्लिकन पक्षाचे कार्य, त्या कार्याच्या माध्यमातून उभे राहिलेले आंदोलन, आणि 3 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पक्षाचा वर्धापन दिनाचे नियोजन, आणि 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण विषयक आंदोलनाविषयी सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना सांगितली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य कार्यकारणी सदस्य एस के चेले साहेब, मराठवाडा सचिव हरीश डावरे साहेब, मराठवाडा अध्यक्ष पोपटराव लांडगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, महिला आघाडीच्या आशा कांबळे, सुमन गायकवाड, उषा खंडागळे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष धम्मशील कदम, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन मुके, युवा जिल्हाध्यक्ष आयु. कदम, तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे, नळदुर्ग शहराध्यक्ष माधव कांबळे, एस के गायकवाड, मारुती खारवे, लोहारा तालुका अध्यक्ष काकासाहेब भंडारे, लोहारा तालुका उपाध्यक्ष बालाजी माटे, बाबासाहेब गायकवाड, दगडू भोसले उपस्थित होते.बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमरगा तालुका अध्यक्ष पदासाठी दगडू भोसले, बाबासाहेब गायकवाड, दिलीप सुरवसे तिघेजण इच्छुक होते. महाराष्ट्र राज्याचे संयुक्त सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य एस के चेले साहेब, मराठवाडा सचिव हरीश डावरे, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे महिला आघाडीच्या आशाताई कांबळे आणि अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार यांच्यात चर्चा होऊन, दगडू भोसले यांनी उमरगा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काम केले असल्याने, या ठिकाणी धडाडीचे नेतृत्व म्हणून बाबासाहेब गायकवाड यांना संधी देण्याचे ठरवून, अध्यक्षपदी बाबासाहेब गायकवाड येणेगूर यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी दिलीप सुरवसे, युवक तालुका अध्यक्ष राजरत्न(बाळू) सूर्यवंशी, आशाताई कांबळे महिला आघाडीचे अध्यक्ष, उषाताई कांबळे कार्याध्यक्ष, सुमनताई गायकवाड उपाध्यक्ष अशी निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


