उमरगा:– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, येथे संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे यांचा 73 वा वाढदिवसानिमित्त दि.10 सप्टेंबर रोजी डीआरएक्स कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता बेडदुर्गे, संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.

डीआरएक्स कट्ट्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. प्रा.मंजुषा गव्हाळे यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला. यामध्ये त्यांचे बालपण, शिक्षण, नोकरीतील अनुभव, समाजिक कार्य याबद्दल माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आपल्या शिक्षण संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिक्षण घेणे कठीण जाते. उत्तम गुणवत्ता असलेले तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करावी.योग्य दिशेने वाटचाल करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.अल्वीन काळे, डॉ. स्नेहल धर्माधिकारी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.मंजुषा बेडदुर्गे, अस्मिता कोकरे, प्रा.अंकिता यादव, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा.किर्ती आर्य, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.मंजुषा गव्हाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


