उमरगा येथे मित्र च्या MahaSTRIDE उपक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

0
143

उमरगा :– महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘MITRA’ अंतर्गत MahaSTRIDE उपक्रमाच्या अनुषंगाने उमरगा लोहारा तालुक्यांचे शाश्वत दरडोई उत्पन्न वाढवण्यासंदर्भात तसेच इतर विषयासंदर्भात दिनांक 12 सप्टेंबर रोजी उमरगा तहसील कार्यालय येथील सभागृहात मित्रचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उमरगाचे तहसीलदार गोविंद येरमे, लोहाराचे तहसीलदार, उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, उमरगा नगर परिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव ,उमरगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी , माजी जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य, माजी बांधकाम सभापती अभय राजे चालुक्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर , वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल जाधव, आदी मान्यवरांच्या उपस्थिती हे बैठक संपन्न झाली. बैठकीत पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की उमरगा शहर हे मेडिकल हब म्हणून पूर्वीपासून ओळखले जाते या क्षेत्राचं विस्तार करण्याकरिता शाश्वत उपायोजना सुचविण्यात यावे ,तसेच उमरगा – लोहारा तालुक्यात साठवण तलावाची मोठी संख्या असून या साठवून तलावाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते का या संदर्भात अभ्यासपूर्ण संकल्पना मांडण्यात यावी ,उमरगा- लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार स्वयंरोजगार वाढविण्याकरिता शाश्वत उपाययोजना सुचवण्यात याव्यात. तसेच उमरगा – लोहारा तालुक्यातील दरडोई उत्पन्नात भरमसाठ वाढ होण्यासाठी ज्या काही उपाय योजना शक्य असतील त्या उपयोजनाची संकल्पना 15 ऑक्टोबर पर्यंत सादर करावे. उमरगा हे शहर सीमावर्ती भागात असल्यामुळे येथे शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असणे महत्त्वाचे आहे . ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार कौशल्य शिकण्यासाठी येथील तरुणांना मदत होईल तसेच उमरगा येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी मित्राच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे करण्यात येणार असल्याची सांगितले धाराशिव हा जिल्हा मागास असून याचा सर्वोत्तम जास्तीत जास्त विकास करण्याकरिता जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या संकल्पना मित्राकडे सादर कराव्यात त्या अनुषंगाने विकासात्मक नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मित्रला खूप मोठी मदत होईल. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, सरचिटणीस विठ्ठल चिकुंद्रे उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती जाधव, पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उमरगा लोहारा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे प्रमुख बैठकीला हजर होते. तसेच तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here