उमरगा :– तालुक्यातील येणेगुर येथील ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर गावातील सागर पाटील यांनी आर्थिक व्यवहारातील गैरव्यवहार गलतन कारभार संदर्भात आरोप पुराव्यानिशी केल्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रश्नांच्या धारेवर धरल्याने दि. 11 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा ही अनेक आरोप प्रत्यारोपाने वादळी ठरली.
दि.11 सप्टेंबर रोजी झालेली ग्रामसभा ही अनेक विषयांनी वादळी ठरली. ग्रामसभेत सरपंच ,ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांना गावतील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागले, भ्रष्टाचार ,आर्थिक व्यवहारातील अनियमितता व गलथान कारभार यावर जनतेने ग्रामसेवक व सरपंचांना धारे वर धरले, दरम्यान भाजपचे माजी सरचिटणीस सागर पाटील यांनी पुराव्यानिशी हायमस्ट बसविण्यात झालेल्या कामातील गैरव्यवहार, Ro plant दुरुस्ती, नवीन बसविणे, cctv, डस्टबिन बसविणे अशा अनेक कामात झालेल्या गैरव्यवहार संदर्भात पुराव्यानिशी माहिती सादर केल्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामसभेत निरुत्तर व्हावे लागले. झालेल्या सर्व कामाची व गैर व्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून ठराव मांडण्यात आला. सागर पाटील यांनी सरपंच याच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला त्याला सर्व नागरिकांच्यावतीने जाहीर खुलेआम पाठिंबा मिळाला व एक मताने तो ठराव मंजूर झाला. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


