उमरगा : तालुक्यातील नाईक नगर तांडा येथील एका 32 वर्षीय तरुणाने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट नुसार एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना दि.13 सप्टेंबर रोजी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सविस्तर वृत्त बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उमरगा तालुक्यातील नाईक नगर येथील ३२ वर्षीय पवन गोपीचंद चव्हाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.चव्हाण यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत “मा. मुख्यमंत्री साहेब, बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्या” असा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे.पवन चव्हाण हे B.Com तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यांच्या मागे पत्नी रूपाली, तीन वर्षांचा मुलगा रुद्र, पाच वर्षांची मुलगी रितिका आणि आई द्रोपदाबाई असा परिवार आहे.


