उमरगा:- तालुक्यातील उमरगा- गुलबर्गा रोडवरील भूसणी पाटीजवळील वळणावर ऑटो पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता उमरगा येथुन मुरुम कडे जाणारा ऑटो क्रमांक MH24E 8184 हा भुसणी पाटीच्या वळणावर येताच चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो पल्टी झाला. त्यात चालक कुमार लक्ष्मण पवार वय- 38 वर्ष ,रा. अंबरनगर, मुरुम हा जखमी झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले . असल्याची माहिती चालक शेषेराव लवटे यांनी दिली.


