उमरगा:- तालुक्यातील पेठसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार शिक्षक, दोन शिक्षिका यांची शासन नियमानुसार दुसऱ्या शाळेत बदली झाली असून, त्यानिमित्ताने निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.13 सप्टेंबर रोजी शाळेत करण्यात आले होते.

यावेळी बदली होऊन जात असलेले शिक्षक चौधरी,स्वामी, भंडारे, साखरे,शिक्षिका गायकवाड, गोबाडे या सर्व शिक्षकांना शाळेतर्फे शाल,हार व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष सुरवसे व त्यांच्या पत्नी सुरवसे यांनीही या सर्व शिक्षकांना मानाचा फेटा,शाल,हार व श्रीफळ देऊन सन्मानित केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.याचबरोबर सर्व विद्यार्थ्यी आपल्या शिक्षकांसाठी विविध भेटवस्तू, गुच्छ देऊन शुभेच्छा देत आपल्या हृदयातील भावना व्यक्त करत होते.बदलीने जात असलेल्या सर्व शिक्षकांतर्फे शाळेसाठी खिचडी वाटपासाठी काही भांडी, प्रत्येक वर्गासाठी घड्याळ, प्रत्येक शिक्षकांसाठी पुस्तक, विद्यार्थ्यासाठी पेन व खाऊ असे भरभरून साहित्य देण्यात आले.कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष उमेश सुरवसे, शिक्षणतज्ज्ञ संजय पाटील, सदस्य अहमद तांबोळी, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे,ग्रा.पं.सदस्य गिरमल दलाल, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष सुरवसे व त्यांच्या पत्नी, शालेय पोषण आहार कर्मचारी सचिन गायकवाड व शुभांगी गायकवाड,अंगुलमाला सुरवसे आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सरवदे, शिक्षिका झिंगाडे, सुरेखा साळुंके ,अर्चना साळुंके, पंडित ,आळणे, युवा प्रशिक्षणार्थी पाटील यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिराजदार यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका गुंजोटे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमानंतर सर्व शिक्षकांना पाटील परिवारातर्फे स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते.


