सुशिक्षित बेरोजगारांनी उद्योजक बनावे –कैलास शिंदे

0
91

 

उमरगा :- सुशिक्षित बेरोजगारांनी  शिक्षण घेतल्यानंतर खाजगी अथवा सरकारी नोकरीच्या पाठीमागे लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा उद्योजक बनून स्वतःची प्रगती करावी असे मत धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा उद्योजक कैलास शिंदे यांनी व्यक्त केले.शहरातील तहसील कार्यालय येथे तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वतीने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन दि.19 रोजी करण्यात आले होते.तुळजापूरचे आमदार तथा मित्र चे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने उमरगा तहसील कार्यालयात स्वयंरोजगार  मिळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विविध मंडळाचे अधिकारी कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी  सांगितले की नोकरदार बनण्यापेक्षा उद्योजक बना नौकरीच्या मागे लागू नका, उद्योग क्षेत्रामध्ये  खूप मोठी संधी आहे जीवनामध्ये मोठे प्रगती करता येईल. याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर माने व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here