उमरगा:– तालुक्यातील बेडगा शिवार व परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतजमिनी, पिके, घरे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ,शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.संबंधीत परिसराची उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे विविध सेल चे पदाधिकारी यांनी पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासन कडून मदत मिळवून देण्याचे याप्रसंगी आश्र्वासित करण्यात आले.

नुकसानीची पाहणी उमरगा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी काॅंग्रसचे युवा नेते अश्लेष (भैया) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. गावातील नुकसानग्रस्त भाग तसेच शेतांमध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला.यावेळी उमरगा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष अर्जुन (भाऊ) बिराजदार, जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस विजय (भैय्या) वाघमारे,उमरगा शहर अध्यक्ष विजयकुमार दळगडे, ज्ञानेश्वर पाटील, जीवन सरपे, अश्लेष भैय्या मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर, प्रफुल्ल गायकवाड, अमित रेड्डी, योगेश माने, दत्त्ता सोंडे पाटील, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना योग्य ती जास्तीत जास्त भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


