धाराशिव :– महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा भक्तिभाव,सांस्कृतिक विविधता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा ठरणार आहे.२२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यात ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत भक्ती,संगीत व नृत्याचा अद्वितीय उत्सव साजरा होणार आहे.
*महोत्सवातील खास आकर्षण*
२२ सप्टेंबर : इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत यांचा भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा.२३ सप्टेंबर : पं.जयतीर्थ मेकुंडी यांची शास्त्रीय संगीत संध्या.२४ सप्टेंबर : अभिजीत जाधव यांची लोकसंगीत मैफल.२५ सप्टेंबर : फोक लोक स्टुडिओचे लोकसंगीत सादरीकरण.२६ सप्टेंबर : शाहीर रामानंद उगले यांचा लोककला जल्लोष.२७ सप्टेंबर : रसिकर्पण डान्स अकॅडमीचे लोकनृत्य सादरीकरण. २८ सप्टेंबर : राणा जोगदंड यांची लोकसंगीत मैफल.२९ सप्टेंबर : नवरात्र थीमवरील ३०० ड्रोनद्वारे लाईट शो.३० सप्टेंबर : फोक आख्यानाची भव्य लोकसंगीत मैफल होणार आहे.प्रेरणादायी सांस्कृतिक व लोककला कार्यक्रम.ख्यातनाम कलाकारांचा सहभाग.भक्ती,संगीत व नृत्याचा आधुनिकतेच्या स्पर्शासह संगम होणार आहे.हा भव्य सोहळा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून,सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर येथे होणार आहे.मंदिर संस्थानने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की,“नऊ दिवस,नऊ रूप,नऊ अनुभव” या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात सहभागी होऊन दैवीकृपेचा अनुभव घ्यावा आणि सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळ्याचा अविभाज्य भाग व्हावे.अधिक माहितीसाठी ९४०३१४८४८४ या क्रमांकावर साधावा.


