लाडकी बहीणसह सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीला साथ द्या-अभयराजे चालुक्य

0
28

 

उमरगा:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने अनेक लोकहितकारी योजना  अंमलात आणल्या आहेत. यामध्ये लाडके बहीण योजनेचा समावेश आहे.  शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा, पीक विमाही काढला आहे शेतकरी सन्मान योजनाही सुरू केली आहे. याशिवाय युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणलेली आहे. विशेष म्हणजे या सर्व योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होत आहेत. युवकांसाठी उद्योजक बनावे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ सुरू केले आहे. यामध्ये युवकांना ५ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंत कर्ज मिळते आहे. याशिवाययुवकांना उद्योजक बनवण्यासाठी विविध महामंडळही महायुतीने स्थापन केली आहे. याद्वारे ही युवकांना आर्थिक मदत केली जात आहे. महिला महिलांसाठी तीन सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजना ही सुरू केली आहे.या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले आहे त्यामुळेच विरोधकांनी लाडकी बहीण यासारख्या योजनेला स्टे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांनी आता जागृत होऊन  या सर्व योजना  चालू ठेवण्यासाठी महायुती सरकारला सर्वांनी निवडून द्यावे. येणारे 20 तारखेला धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून आमदार ज्ञानराज चौगुले यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे.असे आवाहनही माजी  सभापती अभयराजे चालुक्य यांनी केले.उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ गुंजोटी गावात जाहीर सभा घेण्यात आली.याप्रसंगी अध्यक्षस्थानी बसप्पा माळगे, प्रा. माजी खासदार रवींद्र गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, माजी सभापती दिलीप गौतम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, माजी सभापती हरीश डावरे, प्रा. शौकत पटेल, माजी सरपंच विलास व्हटकर, रवींद्र ढगे, चेअरमन सहदेव गायकवाड, माजी सरपंच शंकरराव पाटील, मुकुंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बोलताना सांगितले की, भविष्यकाळात लातूर गुलबर्गा रेल्वे मार्ग केंद्र सरकारच्या सहाय्याने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.पुढे बोलताना आमदार चौगुले यांनी सांगितले की, हायमस्ट लॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देणार. मतदार संघातील सर्व आरोग्य उपकेंद्रात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार, उमरगा व लोहारा येथे स्वतंत्र महिला रूग्णालय करणार. मराठा समाजातील होतकरू लघुउद्योजकासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळाचे लक्षांक वाढवून घेणार आहे.युवकांचा शिवसेनेत प्रवेशमंगेश दूधभाते, नितीन दूधभाते, अविनाश दूधभाते, ज्ञानेश्‍वर काळे, सुरज दूधभाते, विशाल कोळनुरे,निखेश दूधभाते, महेश दूधभाते.यावेळी गुंजोटी गावातील व परिसरातील नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here