शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रीन क्लब पुरस्कार

0
118

उमरगा :– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट ग्रीन क्लब पुरस्कार दिनांक 26 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

उच्च तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्यामार्फत शासन राज्यातील १३ जिल्ह्यांतील महावि‌द्यालयांमध्ये युवकांच्यामार्फत नैसर्गिक संसाधनांचे सरंक्षण व पाण्याची बचत हे अभियान राबविले गेले. निवडक तेरा जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संसाधने व पाण्याची बचत या अभियानांतर्गत सर्व महावि‌द्यालयांत ग्रीन क्लब स्थापन करवून विविध उपक्रम राबविले गेले. यामध्ये धाराशीव जिल्ह्यातून शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रीन क्लब पुरस्कार जाहीर करण्यात आला.

या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवणे, तसेच ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे असे उपक्रम राबविण्यात आले. प्रा.किरण पांचाळ यांनी ग्रीन क्लब फॅकल्टी कोओर्डीनेटर म्हणून काम पहिले. या उपक्रमातर्गत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या हस्ते दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर, पुणे (सीओईपी) येथे होणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे यांनी प्राचार्य महेश कदारे, ग्रीन क्लब फॅकल्टी कोओर्डीनेटर व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here