भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडून अतिवृष्टीची पाहणी

0
46

 

 

उमरगा:–  तालुक्यातील तुगाव, येणेगुर, दाळिंब,कोराळ गावातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  नुकसानीची पाहणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दि.28 रोजी केली. यासोबतच येणेगुर गावातील पावसाने घरांची पडझड झाली होती त्याची पण पाहणी करून नुकसानग्रस्त बाधितांना तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्याची हमी दिली.यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, शिवशंकर हत्तरगे, माधव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस विठ्ठल चिकुंद्रे, किसान मोर्चाचे दिलीप सुरवसे, प्रशांत माने, अजय वाले, सागर पाटील, विवेकानंद हंगरगे, रमेश मुळे, उद्धव बेळंबे देवनंद पांचाळ आदींसह नुकसानग्रस्त आणि इतर शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here