सकल धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भातचे आमदार प्रवीण स्वामी यांना निवेदन

0
45

 

उमरगा:– सकल धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासंदर्भात चा विषय हिवाळी अधिवेशनात उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उपस्थित करावा यासंदर्भातचे निवेदन दि. 29 रोजी आमदार प्रवीण स्वामी यांना संपर्क कार्यालयासमोर ढोल ताशा वाजून आंदोलन करून देण्यात आले.धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागण्या करीता उमरगा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांच्या कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवून अनोखे आंदोलन करण्यात आले. आमदार प्रवीण स्वामी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या काळात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विषय मांडावा व तो मंजूर करून घ्यावा या संदर्भातचे निवेदन गौतमीबाई मल्हारराव होळकर बहुउद्देशिय महिला मंडळ उमरगा यांच्यावतीने देण्यात आले.निवेदनात  महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गात व भारतीय घटनेत 36 क्रमांकावर धनगर ही एकच जमात असून भारतातील इतर राज्यामध्ये अंमल बजावणी झाली  असून,  महाराष्ट्र  अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला असून,समस्त महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र (एस.टी.) देण्याची तात्काळ अंमल बजावणी करावी. शासनाने तात्काळ निर्णय नाही केल्यास विजया दसमी दसऱ्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजाच्यावतीने  तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हंटले आहे.निवेदनावर  वैजीनाथ कागे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष,कलिंदा घोडके महिला प्रदेशअध्यक्षा,शिवाजी गावडे, माजी नगसेवक गोविंद घोडके,जालिंदर सोनटक्के,बालाजी घोडके,अरुण गडदे,उत्तमराव घोडके,राम घोडके,खंडू दुधभाते,अर्जुन दुधभाते,गोपाळ घोडके,लक्ष्मी घोडके,सुवर्ण ब्याळे,कविता घोडके,सविता दुधभाते,शोभा हिंडोळे, कोंडाबाई वाघमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here